मतदान केंद्र, मतमोजणी स्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागू
जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक
वाशिम, दि. ०४ : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यात ७ जानेवारी २०२० रोजी मतदान व ८ जानेवारी २०२० मतमोजणी होणार आहे.
निवडणूक प्रक्रिया व मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मतदान केंद्रांवर मतदानाचे दिवशी ७ जानेवारी २०२० रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तसेच ८ जानेवारी २०२० रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निश्चित केलेल्या मतमोजणीच्या ठिकाणी मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत फौजदारी दंड संहिता १९७३ चे कलम १४४ प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वाशिम यांनी लागू केले आहेत.
*****
Comments
Post a Comment