जिल्हाधिकाऱ्यांनी मानले सहकार्याबद्दल भाऊसाहेब काळे यांचे आभार
- Get link
- X
- Other Apps
जिल्हाधिकाऱ्यांनी मानले
सहकार्याबद्दल भाऊसाहेब काळे यांचे आभार
वाशिम, दि. 24 (जिमाका) : वाशिम येथील काटा मार्गावरील काळे लॉन येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पुणे यांनी 23 नोव्हेंबर रोजी वाशिम शहरातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आपत्तीविषयक प्रशिक्षण दिले. हे प्रशिक्षण देण्यासाठी काळे लॉनचे संचालक भाऊसाहेब काळे यांनी लॉनचे सभागृह नि:शुल्क उपलब्ध करुन दिल्याबद्दल जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज 24 नोव्हेंबर रोजी त्यांचे कक्षात भाऊसाहेब काळे यांचे पुष्पगुच्छ देऊन सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजीरे व धर्मराज चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment