आदिवासी मुलांचे वसतीगृहात बिरसा मुंडा जयंती साजरी
- Get link
- X
- Other Apps
आदिवासी मुलांचे वसतीगृहात
बिरसा मुंडा जयंती साजरी
वाशिम, दि. 18 (जिमाका) : नवीन आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृहात 15 नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. गजेंद्र सरपाते, प्रा. जुनघरे, आदिवासी वसतीगृहाचे प्रमुख एस.एस. वानखडे व एस.जी. घोलप यांची उपस्थिती होती.
श्री. सरपाते यांनी वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या भौतिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व भावनिक समस्येवर उपाययोजना व त्यांचे निराकरण याविषयी माहिती दिली. स्वत:चे ध्येय निश्चित करुन पुढील वाटचाल करण्याविषयी काय करावे हे त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले.
श्री. जुनघरे यांनी विद्यार्थ्यांनी स्वत:च आपल्या जीवनाचा शिल्पकार व्हावे, समस्येवर मात करुन विद्यार्थ्यांनी पुढे जायला पाहिजे. याकरीता त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांचा आदर्श लक्षात ठेवावा व स्वत:मध्ये बदल करावा असे सांगितले. यावेळी वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकातून गृहपाल एस.एस. वानखडे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. संचालन विनोद चापे यांनी तर आभार एस.जी. घोलप यांनी मानले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment