11 नोव्हेंबर रोजीचे वाशिम येथील कायदेविषयक जनजागृती महाशिबीर स्थगित
11 नोव्हेंबर रोजीचे वाशिम येथील
कायदेविषयक जनजागृती महाशिबीर स्थगित
वाशिम, दि. 7 (जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने पॅन इंडिया अंतर्गत नागरिकांचे सक्षमीकरण आणि " हक हमारा भी तो है " या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 11 नोव्हेंबर 2022 रोजी वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन सभागृह येथे कायदेविषयक जनजागृती महाशिबीराचे आयोजन सकाळी 10.30 वाजता करण्यात आले होते.परंतु जिल्ह्यात 287 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने कायदेविषयक जनजागृती महाशिबिर स्थगित करण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment