भारतीय वायुसेनेच्या “अग्निपथ-अग्निवीरवायू” योजनेसाठी २३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले
- Get link
- X
- Other Apps
भारतीय वायुसेनेच्या “अग्निपथ-अग्निवीरवायू” योजनेसाठी २३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले
वाशिम,दि.७ (जिमाका)भारतीय वायुसेनेच्या अग्निपथ या योजनेअंतर्गत अग्निवीरवायू म्हणून भारतीय वायू सेनेत प्रवेश घेवू इच्छिणा-या उमेदवारांनी अग्निवीरवायू पदाच्या परिक्षेकरीता https://agnipathvayu.cdac.in या संकेस्थळावर अर्ज २३ नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करून जिल्हयातील जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा. उमेदवारांनी फक्त ऑनलाइन पध्दतीने अर्ज भरणे आवश्यक आहे आणि ते भरण्यासाठी तपशीलवार सूचना https://agnipathvayu.cdac.in या संकेस्थळावर उपलब्ध आहेत. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त युवकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment