राष्ट्रीय लोकअदालतीत २७४५ प्रकरणांचा निपटारा

राष्ट्रीय लोकअदालतीत २७४५ प्रकरणांचा निपटारा 

वाशिम दि १३ (जिमाका) जिल्हा व सत्र न्यायालय,वाशिम आणि त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व न्यायालयात १२ नोव्हेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत २७४५ प्रकरणांचा निपटारा करण्यात येऊन ४ कोटी १५ लक्ष ८४ हजार १३५ रुपये रक्कम वसूल करण्यात आली.
        ७ ते ११ नोव्हेंबर  दरम्यान जिल्हयातील न्यायालयामध्ये विशेष कलमांतर्गतची प्रकरणे निकाली काढण्याकरीता विशेष मोहीम राबविण्यात आली.यामध्ये जिल्हा तसेच तालुका न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या एकुण ६०१ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
          राष्ट्रीय लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी जिल्हयातील सर्व न्यायीक अधिकारी,वकील संघाचे सदस्य,जिल्हा पोलीस दलाचे कर्मचारी,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी व न्यायालयीन कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश