पोळा “ एक घर एक मेढ ” लावून साजरा करा
- Get link
- X
- Other Apps
पोळा “ एक घर एक मेढ ” लावून साजरा करा
वाशिम, दि. 22 (जिमाका) : 26 ऑगस्ट रोजी बैल पोळा व 27 ऑगस्ट रोजी तान्हा पोळा उत्सव जिल्हयात शहरी व ग्रामीण भागात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाच्या काळात सणाला मेढ म्हणून पळस या बहुआयामी जातीची वृक्षतोड ग्रामीण भागामध्ये मोठया प्रमाणावर केली जाते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जात नाही. ही वृक्षतोड थांबवून वर्षानुवर्षे चालत आलेली सांस्कृतीक परंपरा जोपासून “ एक घर एक मेढ ” ही संकल्पना स्वातंत्र्याच्या अृमत महोत्सवी वर्षात राबवून पोळा हा सण उत्साहात साजरा करावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment