प्राथमिक मराठी शाळा काटा येथे स्वातंत्र्य दिन साजरा

प्राथमिक मराठी शाळा काटा येथे स्वातंत्र्य दिन साजरा  
वाशिम दि.१६(जिमाका) भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट रोजी वाशिम तालुक्यातील काटा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळेत साजरा करण्यात आला.
         शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी ध्वजपुजन केले .शाळेचे मुख्याध्यापक गजानन गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत गायन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रपिता महात्मा फुले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार उपस्थित प्रमुख पाहुणांच्या हस्ते अर्पण करण्यात आले.याप्रसंगी विद्यार्थांची भाषणे झाली.देशभक्तीवर गीत तसेच सांस्कृतिक नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांची मने जिंकली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश कांबळे, शाळा समिती सदस्य बारकु कोबळे, शिक्षणतज्ज्ञ विशाल ताजणे, सुभाष कांबळे, चंदभागा बांगर, माधुरी बांगर व सिताराम कांबळे यांनी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचे व शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले . 
      याप्रसंगी जि प उर्दू शाळा काटाचे मुख्याध्यापक रियाज अली,नुरभाई, अमोल जोंधळे ,सादिक भाई,बंडू लोंढे ,शेख ,निलेश टोलमारे,चेतन गुडधे,डिगंबर कांबळे,बाळू कांबळे ,सकुबाई कांबळे,संगिता गायकवाड ,सविता खरे ,अंगणवाडी सेविका बेबीनंदा लगड,मदतनिस सपना गुडधे,माधुरी बांगर चंद्रभागा बांगर तसेच इंजि.अंकिता गायकवाड यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षिका चंदा खंदारे (गायकवाड ) यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे