8 व 9 ऑगस्ट रोजी नेहरु हॉकी कप क्रीडा स्पर्धा



8 व 9 ऑगस्ट रोजी

नेहरु हॉकी कप क्रीडा स्पर्धा

सहभागी होण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

      वाशिम, दि. 02 (जिमाका) :  जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या संयुक्त वतीने २ ते ९ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत शिवाजी स्टेडीयम, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय ज्युनिअर व सबज्युनिअर नेहरु कप हॉकी क्रीडा स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम अंतर्गत जिल्हास्तरीय नेहरू हॉकी कप (सबज्युनियर/ ज्युनियर) क्रीडा स्पर्धा ८ व ९ ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण विद्यालय, मंगरुळपीर येथे आयोजित करण्यात येणार आहे.

           या जिल्हास्तरीय नेहरु कप हॉकी (सबज्युनियर/ ज्युनियर) क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी जन्मतारखेनुसार वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे. १५ वर्षाखालील मुले, (सबज्युनियर) १ डिसेंबर २००७ किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. १७ वर्षाखालील मुले व मुली (ज्युनियर) १ नोव्हेंबर २००५ किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. जिल्हास्तरीय नेहरु कप हॉकी (सबज्युनियर/ज्युनियर) क्रीडा स्पर्धेत सर्व संघानी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागीपूर्वीच  http://washim.mahadso.co.in/school/login.php या संकेतस्थळावर खेळाडू तसेच संघाची नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघानी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी खेळाडूंकडे जन्मतारखेचा दाखला, आधारकार्ड व पासपोर्ट (सर्व मुळ प्रती) असणे आवश्यक आहे.

           राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंची वैद्यकीय तपासणी होणार असून त्यामध्ये एखादा खेळाडू अधिक वयाचा आढळल्यास संपूर्ण संघ बाद करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण विद्यालय, मंगरुळपीर येथे स्पर्धेची उपस्थिती स्पर्धेच्या दिवशी सकाळी ९ वाजता घेण्यात येणार आहे. अधिक माहितीकरीता राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी केले आहे.

                                                                                                                                                *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे