घरोघरी तिरंगा शहरी भागात ५३ हजार ठिकाणी फडकणार तिरंगा


घरोघरी तिरंगा
शहरी भागात ५३ हजार ठिकाणी फडकणार तिरंगा 

वाशिम दि ५ (जिमाका)१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ६ नगरपालिका व नगरपंचायतीच्या शहरी भागात ५३ हजार १४८ ठिकाणी तसेच शहरातील खाजगी आस्थापनावर देखील तिरंगा ध्वज फडकणार आहे.
        वाशिम शहरातील १५ हजार ३८२ घरांवर,९३ नगरपालिका व खाजगी शाळांच्या इमारतीवर, ३२ अंगणवाड्यांवर,२ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारती आणि ४५ शासकीय इमारतीवर,रिसोड शहरात ५ हजार ९५२ घरांवर,३५ शाळा,१५ अंगणवाड्या,एक आरोग्य केंद्र आणि १० शासकीय इमारतीवर तिरंगा फडकणार आहे.
       मानोरा शहरातील २ हजार ११० घरांवर,१३ शाळा,५ अंगणवाडी आणि ११ शासकीय इमारतीवर, मंगरूळपीर शहरातील ८ हजार ९६९ घरांवर,२६ शाळा,१८ अंगणवाड्या, एक शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र,एक आरोग्य उपकेंद्र आणि १४ शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज उभारले जाणार आहे.
        मालेगाव शहरातील ४ हजार ४२० घरांवर,१६ शाळा,७ अंगणवाडी,एक शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १३ शासकीय इमारतीवर,कारंजा शहरातील १५ हजार ८४९ घरांवर,५३ नगरपालिका आणि खाजगी शाळांवर,३२ अंगणवाडी केंद्र, एक शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २१ शासकीय इमारतीवर तिरंगा ध्वज फडकणार आहे.
          जिल्ह्यातील शहरी भागातील ५२ हजार ६८२ घरांवर,२३६ नगर पालिका,नगर पंचायतीच्या व खाजगी शाळांच्या इमारतीवर,१०९ अंगणवाड्या,६,शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र,एक आरोग्य उपकेंद्र आणि ११४ शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. राष्ट्रध्वज उभारण्यात येणाऱ्या सर्व ठिकाणी ध्वज संहितेचे पालन करणे आवश्यक आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे