जिल्हा न्यायालयात वृक्षारोपण
- Get link
- X
- Other Apps
जिल्हा न्यायालयात वृक्षारोपण
वाशिम, दि. 05 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने नुकतेच जिल्हा न्यायालयाच्या परिसरात अतिरिक्त जिल्हाधिकारी शहाजी पवार व वन विभागाचे श्री. रत्नपारखी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. कलोती, जिल्हा न्यायाधीश एच. एम. देशपांडे, एच. आर. वाघमारे, एन. आर. प्रधान, सरकारी अभियोक्ता पी. एस. ढोबळे, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) व्ही. व्ही. नाशिककर, मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एस. घोरपडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी, सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एन. पी. पवार, आर. पी. कुलकर्णी, एस. एस. उबाळे, व इतर न्यायाधीश, जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी व न्यायालयीन कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment