जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
·
पंचायत समिती,
जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयात अर्जाचा नमुना उपलब्ध
वाशिम,
दि. ३० : जिल्हा परिषदेच्या समाज
कल्याण विभागामार्फत सन २०१८-१९ करिता २० टक्के जिल्हा परिषद सेस अंतर्गत
मागासवर्गीय वस्तीत दिवाबात्तीची (एल.ई.डी. लाईटची) सोय करणे (सामुहिक लाभाची
योजना) व मागासवर्गीय शेतकऱ्यांना डीझेल इंजिन पुरविणे (वैयक्तिक लाभाची योजना) ह्या
योजना १०० टक्के अनुदानावर डी. बी. टी. तत्वावर राबविण्यात येत आहेत.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी सादर करावयाच्या अर्जाचे नमुने तसेच
माहिती संबंधित पंचायत समिती कार्यालय व जिल्हा परिषदेतील जिल्हा समाज कल्याण अधिकारी
कार्यालय येथे उपलब्ध आहे. तरी इच्छुक ग्रामपंचायत तसेच लाभार्थ्यांनी आपले
परिपूर्ण अर्ज व आवश्यक कागदपत्रे दि. १० सप्टेंबर २०१८ पर्यंत संबंधित पंचायत समिती
कार्यालयात जमा करावीत, असे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समिती सभापती पानुताई
जाधव व जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस. एन. खमितकर यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment