पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये आज खरीप हंगाम पूर्व तयारी बैठक
·
जिल्हास्तरीय विभाग
प्रमुखांचीही बैठक
वाशिम, दि. १२ : महसूल
राज्यमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड हे गुरुवार, दि. १३ एप्रिल २०१७
रोजी वाशिम दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये खरीप हंगामासाठी
प्रशासनाने केलेल्या पूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या मुख्य सभागृहात सकाळी ११ वाजता होणाऱ्या या बैठकीला जिल्हाधिकारी
राहुल द्विवेदी यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार
आहेत.
पालकमंत्री ना. राठोड हे दि.
१३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता शासकीय वाहनाने दारव्हा, कारंजा मार्गे वाशिमकडे
प्रयाण करतील. सकाळी १०.३० वाजता त्यांचे वाशिम येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन
होईल. सकाळी ११ वाजता त्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य
सभागृहात आयोजित खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठक होईल. यानंतर दुपारी १ वाजता जिल्हास्तरीय
विभाग प्रमुखांचीही बैठकही पालकमंत्री ना. राठोड यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.
यामध्ये गावठाण जमिनी, सन २०१३ मध्ये महापुरामुळे खरडून गेलेल्या जमिनींचे पंचनामे
आदी विषयांच्या अनुषंगाने आढावा घेण्यात येणार आहे.
दुपारी ३ वाजता पालकमंत्री
ना. राठोड हे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यात सुरु असलेल्या
कामांचा आढावा घेतील. तसेच मालेगाव तालुक्यातील मौजे माळेगाव येथील संग्राहक तलावाच्या
कामाच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. दुपारी
३.३० वाजता त्यांचे शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. याठिकाणी आयोजित बैठकीला ते
उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सोयीनुसार शासकीय वाहनाने यवतमाळ निवासस्थानाकडे
प्रयाण करतील.
Comments
Post a Comment