जिल्हाधिकाऱ्यांची सोनखास येथील जि.प. शाळेला भेट



जिल्हाधिकाऱ्यांची सोनखास येथील

जि.प. शाळेला भेट

      वाशिम, दि. 07 (जिमाका) : वाशिम तालुक्यातील सोनखास येथील जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्राथमिक शाळेला जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज 7 ऑक्टोबर रोजी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर व उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

         श्री. षण्मुगराजन व श्रीमती पंत यांनी शाळेच्या प्रत्येक वर्गाला भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांकडून गुणाकार, भागाकार, गणीतीय क्रीया व वाचन करुन घेऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची पडताळणी केली. शाळेच्या भौतिक सुविधा, शालेय पोषण आहार, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध शैक्षणिक योजना तसेच शाळेच्या विकासात ग्रामस्थांच्या योगदानाबाबतची माहिती त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांकडून घेतली. तसेच अंगणवाडीलासुध्दा भेट देऊन लाभार्थी बालके, त्यांना देण्यात येणारा आहार व त्याअनुषंगाने इतर बाबींची माहिती घेतली.

                                                                                                                                     *******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे