सामाजिक न्याय विभाग स्थापना दिनी 51 लाभार्थ्यांना मिळणार जात वैधता प्रमाणपत्र
- Get link
- X
- Other Apps
सामाजिक न्याय विभाग स्थापना दिनी
51 लाभार्थ्यांना मिळणार जात वैधता प्रमाणपत्र
वाशिम, दि. 14 (जिमाका) : 15 ऑक्टोबर 1962 रोजी सामाजिक न्याय विभागाची स्थापना करण्यात आली. दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस सामाजिक न्याय विभागाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाच्या अनुषंगाने 15 ऑक्टोबर रोजी जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालय, वाशिमच्या वतीने सामाजिक न्याय विभागाचा स्थापना दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सामाजिक न्याय विभागाव्दारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमादरम्यान 51 लाभार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल यांनी दिली.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment