ऊर्जा संवर्धन " यावर चित्रकला स्पर्धा जिल्हा,राज्य व राष्ट्रियस्तर स्पर्धेचे आयोजन

"ऊर्जा संवर्धन " यावर चित्रकला स्पर्धा 

जिल्हा,राज्य व राष्ट्रियस्तर स्पर्धेचे आयोजन



वाशिम दि.28 (जिमाका) योग्य पद्धतीने ऊर्जेचा वापर केल्यास बचत करण्यासोबतच पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांपासून वीज निर्मितीमुळे उदभवणारे दूष्परिणाम टाळता येणे शक्य आहे.म्हणुनच ऊर्जा बचतीविषयीची शालेय विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांमध्ये जाणिव निर्माण व्हावी या उद्देशाने ऊर्जा दक्षता ब्युरो, विद्युत मंत्रालय,भारत सरकार यांच्यावतीने इयत्ता 5 ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा,राज्य व राष्ट्रीय स्तरावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जाच्या वतीने आयोजित या चित्रकला स्पर्धेत इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गट “अ”तसेच आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गट “ब”  असे दोन गट आहे. 
'गट -अ' साठी चित्रकलेचे विषय असे आहेत. 
1) देशभक्तीची मेणबत्ती पेटवा, राष्ट्रासाठी ऊर्जा वाचवा.(Light the Candle of Patriotism,Save Energy for the Nation), 2) ऊर्जा बचतीचे नियम तयार करून स्वप्नांचे जग बनवूया.(Let's make a world of dreams,by creating rule of energy saving),  'गट – ब' साठी विषय असे आहेत,   1) चला भविष्य लिहू, इलेक्ट्रिक वाहनांवर स्विच करू.(Let's write the future, Switch to Electric Vehicle), 2) आपण उठून आपला अभ्यास पूर्ण करूया, राष्ट्रासाठी ऊर्जा वाचवूया. (Let's us rise and complete our study,Save Energy for Nation.)
  या स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभागी झाल्याबद्दल आयोजकांमार्फत प्रशस्ती पत्रक देण्यात येईल.

ऊर्जा दक्षता ब्युरो यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शालेयस्तरावरील 50 उत्कृष्ट चित्रांची निवड करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यास प्रत्यक्ष स्थळावर चित्र काढण्यासाठी दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी बोलविण्यात येईल. गट - अ  व ब  च्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांस व प्रत्येकाबरोबर एका पालकांस रेल्वेच्या स्लीपर क्लासने  प्रवासाचा खर्च व प्रत्येक विद्यार्थ्यास रुपये 2 हजार आयोजकामार्फत अदा करण्यात येईल व सोबतच प्रमाणपत्र देण्यात येईल.
 गट “अ” व “ब” मधील राज्यस्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार पटकाविणारे विजेते राष्ट्रस्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी दिल्लीला 12 डिसेंबर 2022 रोजी आमंत्रित करण्यात येतील. गट-“अ” व “ब” च्या राष्ट्रस्तरीय स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यास व प्रत्येकाबरोबर एका पालकास रेल्वेच्या स्लीपर क्लासने  प्रवासाचा खर्च व प्रत्येक विद्यार्थ्यास रुपये 2 हजार आयोजकामार्फत अदा करण्यात येतील व सोबतच प्रमाणपत्र देण्यात येईल. 
 
या स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम अशी आहे.
राज्यस्तरीय पारितोषिके:- प्रथम 50 हजार,  द्वितीय  30 हजार , तृतीय 20 हजार,  उत्तेजनार्थ (दहा पारितोषिके) 7500 (प्रत्येकी). 
राष्ट्रीय स्तरीय पारितोषिके:- प्रथम 1 लक्ष,  द्वितीय 50 हजार, तृतीय 30 हजार, उत्तेजनार्थ (दहा पारितोषिके) 15 हजार  (प्रत्येकी).
 विजेत्यास “राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन” 14 डिसेंबर 2022 निमित्त आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते नवी दिल्ली येथे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.या स्पर्धेबाबतच्या नियम, अटी व शर्तींची सविस्तर माहिती www.bee-studentsaward.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन ऊर्जा संवर्धनाच्या या राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा असे आवाहन महाराष्ट्रातील ऊर्जा विकास अभिकरणचे विभागीय महाव्यवस्थापक  प्रफुल्ल तायडे यांनी केले आहे. 
 ०००००००००

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे