जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर

जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर

वाशिम दि.७ (जिमाका) जिल्हयातील सर्व सहा पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण आज ७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन सभागृह येथे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोडत सभेत निश्चित करण्यात आले.
         आज झालेल्या सोडत सभेत जिल्ह्यातील ६ पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.यामध्ये वाशीम पंचायत समिती सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), मंगरुळपीर पंचायत समिती सभापती पद अनुसूचित जातीसाठी,मानोरा व मालेगाव पंचायत समिती पदाचे आरक्षण सर्वसाधारण (महिला) आणि रिसोड व कारंजा पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. 
             सोडत सभेला सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नू.पी.एम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे व कार्यालय अधीक्षक राहुल वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे