बालक दत्तक घेण्यासाठी इच्छुक पालकांनी संकेतस्थळावर अर्ज करावा
- Get link
- X
- Other Apps
बालक दत्तक घेण्यासाठी इच्छुक पालकांनी
संकेतस्थळावर अर्ज करावा
महिला व बाल विकास विभागाचे आवाहन
वाशिम, दि. 13 (जिमाका) : बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ च्या कलम ६७ आणि ६८ अन्वये व सुधारीत दत्तक विधान प्रक्रीया नियमावली २०२२ नुसार दत्तक विधान प्रक्रियेतील प्रकरणे जिल्हाधिकारी यांच्याकडे हस्तांतरीत करण्याबाबतची तरतूद नियम ४५ मध्ये करण्यात आली आहे.
ही प्रक्रिया www.cara nic.com या संकेतस्थळावर दत्तक घेणारे व देणारे इच्छुक पालक नोंदणी करू शकतात. अधिक माहितीकरीता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत कक्ष क्रमांक 204, दूरध्वनी क्रमांक 07252-234280 यावर संपर्क करावा. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी बेकायदेशीर दत्तक प्रक्रीया कुठेही होत असल्यास नियमानुसार दत्तक घेणारा व देणारा त्या प्रक्रियेतील सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. वरील अधिनियमानुसार व सुधारीत दत्तक विधान नियमावली सप्टेंबर २०२२ नुसार बालक दत्तक घेण्याची प्रक्रीया इच्छुक पालकांनी करावी. असे आवाहन प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रियंका गवळी यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment