जिल्हा ग्रंथालय कार्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

जिल्हा ग्रंथालय कार्यालयात 
वाचन प्रेरणा दिवस साजरा 

वाशिम दि. 15 (जिमाका) माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आज 15 ऑक्टोबर रोजी जिल्हा शासकीय ग्रंथालय अधिकारी कार्यालयात डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित तसेच त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.प्रदर्शनाचे उद्घाटन सेवानिवृत्त प्रा पी.आर.टाले यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश कोलते व अरिहंत टेक्निकल इन्स्टिट्यूटचे संचालक प्रशांत गडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
        ग्रंथ प्रदर्शनाच्या निमित्ताने उपस्थित वाचकांना डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची अग्निपंख, एपीजे अब्दुल कलाम माझी जीवन यात्रा,मी देशाला काय देऊ शकतो, इंडिया - 2020, टर्निंग पॉईंट - एपीजे अब्दुल कलाम, मिशन इंडिया यासह त्यांची अन्य पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली.
       कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील संतोष कंडारकर, जी.बी. बेंद्रे, विलास कांबळे तसेच विद्यार्थी धीरज चव्हाण, विकी राठोड, बालाजी कोरडे,संजय चव्हाण,रेश्मा भगत,प्रियंका राऊत, पूजा जाधव, काजल पवार,स्वाती भगत यांचेसह मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची व वाचकांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे