फिट इंडिया प्रश्नमंजुषा २०२२ शाळा व महाविद्यालयांनी सहभाग नोंदवावा जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

फिट इंडिया प्रश्नमंजुषा २०२२

शाळा व महाविद्यालयांनी सहभाग नोंदवावा

जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

         वाशिम, दि. 13 (जिमाका) : फिट इंडिया प्रश्नमंजुषा २०२२ अंतर्गत शाळास्तरावरील खेळाडू विदयार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने फिट इंडिया प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात येत आहे. जिल्हयातील शाळा व  महाविदयालयातील प्राचार्य व मुख्याध्यापक यांनी शाळेचा यु.डी.आय.ई क्रमांकासह स्वतःचा ई-मेल समावेश करावयाचा आहे. सहभागी विद्यार्थ्यांची प्रवेश फी ५० रुपये ही ऑनलाईन पध्दतीने शाळेने भरावी.

         फिट इंडिया ही प्रश्नमंजुषा तीन स्तरावरुन राष्ट्रीयस्तर हा अंतीम ठेवण्यात आलेला आहे. स्तर- अ मध्ये १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत प्रत्येक शाळेतील केवळ दोन विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवायचा आहे. त्यासाठी https://fitindia.nta.ac.in/ या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे. स्तर- ब मध्ये (Preliminary Round) प्राथमिक फेरीच्या बॅचमध्ये मोबाईलवर आधारीत चाचणी होईल. या चाचणीमध्ये ६० प्रश्न असुन त्याचा कालावधी ३० मिनिटांचा राहील. या पुढील स्तर- क मध्ये डिसेंबर २०२२ या महिन्यात राज्यातील विविध शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. नंतर राज्यातील गुणवंत विद्यार्थी हे अंतिम फेरीत सहभागी होतील. अंतिम फेरी ही राष्ट्रीय स्तरावरील आहे. त्यामध्ये देशातील ३६ राज्यातील गुणवंताचा सहभाग राहील. त्या प्रश्नमंजुषामधून राष्ट्रीयस्तरावरील गुणवंत विदयार्थी निवडला जाईल.

          या प्रश्न मंजूषा फेरीत बक्षिसांची एकूण रक्कम ३ कोटी २५ लक्ष रुपये आहे. प्राथमिक फेरीतील विजेत्यास २ हजार रुपये तर शाळेला १५ हजार रुपये, राज्यस्तरावरील दुसऱ्या उपविजेत्यास ५ हजार रुपये तर शाळेस ५० हजार रुपये, राज्यस्तर पहिल्या उपविजेत्यास १० हजार रुपये तर शाळेला १ लक्ष रुपये आणि राज्यस्तर विजेत्यास २५ हजार रुपये तर शाळेस २ लक्ष ५० हजार रुपये बक्षिस वितरण करण्यात येणार आहे.

            राष्ट्रीयस्तरावरील दुसऱ्या विजेत्यास १ लक्ष रुपये तर शाळेस १० लक्ष रुपये, राष्ट्रीयस्तरावरील पहिल्या उपविजेत्यास १ लक्ष ५० हजार रुपये तर शाळेस १५ लक्ष रुपये बक्षिस देण्यात येईल. अंतिम राष्ट्रीय विजेत्यास 2 लक्ष 50 हजार रुपये तर शाळेस २५ लक्ष रुपये बक्षिस देण्यात येईल. अंतिम स्पर्धा जानेवारी २०२३ मध्ये संपन्न होणार आहे. या राष्ट्रीय प्रश्नमंजुषामध्ये शारिरीक हालचाली या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. अंतिम फेरीचे विश्लेषण राष्ट्रीयस्तरावरुन प्रसारण करण्यात येणार आहे. तरी जिल्हयातील शाळा, महाविद्यालयातील मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी फिट इंडिया प्रश्नमंजुषा २०२२ मध्ये सहभागी व्हावे. असे आवान जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी केले आहे.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे