जिल्ह्याची हंगामी पैसेवारी सरासरी ५४ पैसे जाहीर
- Get link
- X
- Other Apps
जिल्ह्याची हंगामी पैसेवारी सरासरी ५४ पैसे जाहीर
वाशिम दि.०२(जिमाका) सन २०२२-२३ च्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची जिल्ह्याची सरासरी हंगामी पैसेवारी ५४ पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे.जिल्ह्यात एकूण ७९३ महसूल गावे आहेत.यातील १४८ गावांची खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे.तर ६४५ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा जास्त आढळून आली आहे.
वाशिम तालुक्यात एकूण १३१ महसुली गावे आहेत.या सर्व १३१ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त आहे.मालेगाव तालुक्यातील १२२ गावांपैकी १०८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आणि १४ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त आहे. रिसोड तालुक्यात १०० महसूली गावे असून त्यापैकी ४० गावांची हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आणि ६० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे.मंगरुळपीर तालुक्यात १३७ महसूल गावे असून या सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे.कारंजा तालुक्यात एकूण १६७ महसूली गावे असून या सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे.मानोरा तालुक्यात १३६ गावे आहे.या १३६ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे.एकूण जिल्ह्यातील खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी सरासरी ५४ पैसे इतकी आढळून आली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment