जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय बालिका दिन साजरा
- Get link
- X
- Other Apps
जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय बालिका दिन साजरा
वाशिम, दि. 12 (जिमाका) : जिल्हा रुग्णालय, वाशिम येथे प्रभारी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धर्मपाल खेळकर यांच्या अध्यक्षतेखाली 11 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी भुलतज्ञ डॉ. अनिल कावरखे, बाहय संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. हेडाऊ, वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव, मेट्रन श्रीमती चव्हाण, श्रीमती मवाळ, श्रीमती घुगे, श्रीमती काळणे, ॲड. राधा नरवलीया व नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. खेळकर यांच्या हस्ते नवजात शिशु बालिकांना नविन ड्रेसचे वाटप करण्यात आले. बालिकांच्या मातांना पुष्पगुच्छ देऊन फळांचे वाटप करण्यात आले. डॉ. कावरखे यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या अंतर्गत मुलींच्या शिक्षणाचे व जन्माचे महत्व पटवून दिले. ॲड. राधा नरवलीया यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ याबाबत रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना समुपदेशन केले. उपस्थितांना मुलगा व मुलगी एक समान हा संदेश दिला.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment