पालकमंत्री संजय राठोड 21 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात

पालकमंत्री संजय राठोड आज जिल्ह्यात 

वाशिम दि.20 (जिमाका) पालकमंत्री संजय राठोड हे आज 21ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.सकाळी 8.30 वाजता यवतमाळ निवासस्थान येथून शासकीय वाहनाने वाशिमकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह वाशिम येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती,सभागृह येथे आयोजित जिल्हा नियोजन समिती सभेला उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेला उपस्थिती.दुपारी 2 वाजता अतिवृष्टी, मदत व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान वाटपा संदर्भात जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक. दुपारी 2.15 वाजता नियोजन समिती सभागृह येथे "आनंदाचा शिधा " या योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांमध्ये पामतेल,साखर, रवा, चणाडाळ वाटपाबाबत आढावा बैठक. दुपारी 2.30 वाजता समाधान शिबिरासंदर्भात जिल्हा प्रशासन  अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. दुपारी 2.45 वाजता जिल्हास्तरीय पाणी आरक्षण बैठकीला उपस्थित राहतील.दुपारी 3 वाजता सेवा पंधरवडानिमित्त विविध लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करतील.दुपारी 3.40 वाजता जिल्हा स्त्री रुग्णालय येथील अत्याधुनिक शस्त्रक्रियागृहाचे उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहतील.दुपारी 4.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथून शासकीय वाहनाने दिग्रसकडे प्रयाण करतील.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश