चित्ररथाद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रसिद्धी



* जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम

वाशिम, दि. 26 : जिल्ह्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची जनजागृती चित्ररथाद्वारे करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती उपयोजना 2019-20 अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या या चित्ररथाला आज, 26 फेब्रुवारी रोजी अमरावती येथे समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे व उपसंचालक (माहिती) राधाकृष्ण मुळी यांनी हिरवी झेंडी दाखविली.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, हर्षवर्धन पवार (अमरावती), डॉ. मिलिंद दुसाने (अकोला), राजेश येसनकर (यवतमाळ),
सहायक संचालक गजानन कोटूरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या महिला बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा, रमाई आवास योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती योजना आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुला-मुलींसाठी निवासी शाळा यासह इतर योजनांची माहिती चित्ररथाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तसेच जिल्हा माहिती कार्यालयाने अनुसूचित जाती उपयोजना 2019-20 अंतर्गत तयार केलेल्या घडीपुस्तिका व भित्तीपत्रकांचे वितरणही चित्ररथाच्या माध्यमातून संबंधित गावात करण्यात येणार आहे. आंतरजातीय विवाह, बचत गटांना मिनी ट्रॅक्टर वाटप व कौशल्य प्रशिक्षण या ऑडिओ- व्हिडीओ जिंगल्स चित्ररथावरील टीव्हीवरून दाखविण्यात येणार आहे, तसेच विविध तेरा योजनांचे ऑडिओ जिंगल्स  चित्ररथावरून एकविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात चित्ररथाद्वारे जनजागृती केली जाणार आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे