समुदाय विकास योजना अंतर्गत येवती येथे एकदिवशीय कार्यशाळा संपन्न
वाशिम, दि. १५ : ग्रामीण भागातील युवक-युवतींना गावाच्या गरजेनुसार मोफत प्रशिक्षण देणे व विविध तंत्रज्ञानाची माहिती देवून गावातील लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत करण्यासाठी वाशिम शासकीय तंत्रनिकेतनच्यावतीने समुदाय विकास योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत येवती येथे एकदिवशीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. अध्यक्षस्थानी पोलीस पाटील संपतराव शिंदे होते.
योजनेचे समन्वयक प्रा. ल. कि. लोणकर, नारायण आरु, भगवान शिंदे, दत्ताराव बांगर, श्री. साव्के, श्री. गडेकर, श्री. काळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेमध्ये विद्युत उपकरणे दुरुस्ती, दुचाकी, गॅस शेगडी, कुकर, मिक्सर दुरुस्तीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच येवती येथे सुरु असलेल्या ब्युटीशियन आणि हेअर ड्रेसिंग अभ्यासक्रमातील प्रवेश घेतलेल्या ४५ प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. संचालन मंगला ढोरे यांनी केले, तर आभार प्रशिक्षिका कल्पना शिंदे यांनी मानले.
*****
Comments
Post a Comment