जी.डी.सी.अँड ए., सी.एच.एम. परीक्षेसाठी १६ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन
वाशिम, दि. १५ : सहकार खात्यामार्फत घेण्यात येणारी जी. डी. सी. ॲण्ड ए. व. सी.एच.एम परीक्षा २२, २३ व २४ मे २०२० रोजी घेण्यात येणार असून परीक्षार्थीकडून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज १५ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२० पर्यंत भरता येतील.
परीक्षार्थींसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तयार केलेला युझर आयडी व पासवर्ड परीक्षेचा निकाल प्रसिद्ध होईपर्यंत योग्य प्रकारे जतन करून ठेवणे आवश्यक आहे. जी. डी. सी. ॲण्ड ए. परीक्षा शुल्क ८०० रुपये तर सी.एच.एम परीक्षा शुल्क ५०० रुपये आहे. सविस्तर सूचना वाशिम येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर तसेच sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आर. एन. कटके यांनी कळविले आहे.
*****
Comments
Post a Comment