अवकाळी पावसामुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घ्या

 


·       कृषि विभागाचे आवाहन

·       पुढील तीन दिवस पावसाची शक्यता

वाशिम, दि. १५ (जिमाका) : जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये चांगला पाऊस झाला असल्याने पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे रब्बी हंगामात पेरणी क्षेत्रात सरासरी क्षेत्राच्या ११४ टक्के क्षेत्रावर गहू व हरभरा पिकाची लागवड झाली. यामध्ये गहू पेरणी क्षेत्र ३३ हजार ४८२ हेक्टर व हरभरा पेरणी क्षेत्र ५९ हजार ५३२ हेक्टर आहे.

 ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी करण्यात आलेल्या पिकाचा परिपक्व होण्याचा कालावधी पूर्ण झाला असून पिक काढणीस आलेले आहे. काही ठिकाणी गहू व हरभरा पिकाची काढणी चालू आहे. काही शेतकऱ्यांनी पिकाची काढणी करून शेतामध्ये सुकवणी करिता ढीग लावलेले आहेत.

 हवामान खात्याच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणात उष्णता निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या १६ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे कापणी करून ठेवलेल्या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच त्याचे ढीग लावून झाकून ठेवावे किंवा शक्य असल्यास मळणी करून आपल्या पिकाचे अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश