जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा
वाशिम,दि.1 (जिमाका) आज 1 ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि. प. वाशिम तसेच जिल्हा जात पडताळणी समिती, वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने 1 ऑक्टोंबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव न्या .विजय टेकवाणी यांनी केले. अध्यक्षस्थानी श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, वाशिमचे प्राचार्य प्रा. यु. एस. जमदाडे होते.
कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त गोपाळराव आटोटे गुरुजी, चंद्रभान पोळकर, शिवमंगल अप्पा राऊत, श्रीमती वनमाला पेंढारकर, प्रकाश गवळीकर, , श्री सरस्वती समाज कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. शिंदे, श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. पी. आर. गोरे, प्रा. पवार, बी. बी. ताजणे, माजी लेखाधिकारी पुरुषोत्तम मुंधरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. बी. एन. चव्हाण, अर्जुन राऊत, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम दीप प्रज्वलन करुन महापुरुषांच्या प्रतिमेला हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकातून श्री .वाठ यांनी जेष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारिरीक, मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे. वृद्धापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण आहे.म्हणूनच 1 ऑक्टोबर हा दिन जागतिक जेष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो असे सांगितले.
श्री . टेकवाणी यांनी नागरीकांच्या समस्या व त्यासंबंधी मार्गदर्शन उपस्थितांना केले. प्रा. श्री .गोरे यांनी कुटुंब प्रमुख म्हणून जेष्ठ नागरिकांना मान दिला पाहिजे व त्यांचा सांभाळ करुन त्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या अनुभवाचा आपण उपयोग करुन घेतला पाहिजे असे सांगितले.
श्री. गोपाळराव आटोटे गुरुजी यांनी तथागत गौतम बुद्धांनी दु:खाच्या मूळ कारणाचा शोध घेवून तथागत गौतम बुद्ध झाले ज्याप्रमाणे श्रावणबाळाने आपल्या आई-वडीलांची इच्छा पूर्ण केली तशीच आपण सुद्धा आपल्या आई-वडीलांचा सांभाळून करुन त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे असे सांगितले. श्री. पोळकर यांनी ज्येष्ठ नागरीकांनी आपल्या पाल्यांसाठी खूप खस्ता खाललेल्या आहेत म्हणून त्यांची काळजी प्रत्येक पाल्याने घेतली पाहिजे.असे सांगितले .श्री. राऊत यांनी तरुणांच्या कुटुंबाप्रती असणारी तरुण पिढी पार पाडत नाही, प्रत्येक तरुण व तरुणीवर जेष्ठ नागरीकांची काळजी घेण्याची जबाबदारी आहे. असे सांगितले.
प्रा. श्री. चव्हाण यांनी ज्येष्ठ नागरिकांना नेहमीच दुय्यम स्थान दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांनी स्वातंत्र्य लढयात वेळोवेळी मौलिक मार्गदर्शन केले असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणामध्ये प्रा. श्री. जमदाडे यांनी समाजामध्ये कुटूंब पद्धती बदलत चाललेली आहे आपले जीवन हे जेष्ठांच्या अनुभवाच्या पायावर उभे केले पाहिजे असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. आरती लक्ष्मण श्रृंगारे हिने केले. कार्यक्रमाला जिल्हयातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच समाज कार्य महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व विद्यार्थींनी, ब्रिक्स प्रा. लि. व क्रीस्टल कंपनीचे व्यवस्थापक अनिल गायकवाड व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment