*जि.प.च्या रिक्तपदांसाठी* *21 ते 23 ऑक्टोबरपर्यंत परीक्षा*


*जि.प.च्या रिक्तपदांसाठी*
 *21 ते 23 ऑक्टोबरपर्यंत परीक्षा*
 
वाशिम,दि.17 (जिमाका) जिल्हा परिषदेच्या विविध गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.त्यानुसार ऑनलाईन पध्दतीने अर्ज केलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन परिक्षेचे वेळापत्रक आयबीपीएस कंपनीकडून प्राप्त झाले आहे.ही परीक्षा डिजीटल परीक्षा परिसर, गुलाटी टॉवर,शासकीय तंत्रनिकेतन समोर,लाखाळा,रिसोड रोड,वाशिम या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. 
                 परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते सकाळी 10.30 वाजता,सकाळी 11 ते दुपारी 2.30 वाजतापर्यंत आणि दुपारी 3 ते सायंकाळी 6.30 वाजतादरम्यान कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) बांधकाम/ ग्रामीण पाणी पुरवठा या पदासाठी पहिले,दुसरे व तिसरे सत्रात, 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते सकाळी 10.30 वाजता,सकाळी 11 ते दुपारी 2.30 वाजतापर्यंत आणि दुपारी 3 ते सायंकाळी 6.30 वाजतादरम्यान औषध निर्माण अधिकारी या पदासाठी पहिले,दुसरे व तिसरे सत्रात आणि 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते  सकाळी 10.30 वाजता कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) बांधकाम/ग्रामीण पाणी पुरवठा या पदासाठी पहिले सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे.
           परीक्षेकरीता ज्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेकरीता वाशिम परीक्षा केंद्र मिळाले आहे.त्यांचे परीक्षेचे ओळखपत्र व परीक्षेपूर्वी उमेदवारांच्या होणाऱ्या आवश्यक तपासणीबाबत www.zpwashim.in या संकेतस्थळावर सूचना उपलब्ध आहे. तसेच प्रवेशपत्रामध्ये दिलेल्या सुचनांचे पालन करावे.परीक्षाविषयक वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचना संकेतस्थळावर कळविण्यात येईल.असे सदस्य सचिव जिल्हा निवड समिती तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, वाशिम यांनी कळविले आहे      
                  *******

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर