जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांची प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना भेटी*


जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांची प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना भेटी

वाशिम दि.15(जिमाका) जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी आज 15 ऑक्टोबर रोजी मालेगाव तालुक्यातील आरोग्य वर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशी, उपकेंद्र डोंगरकिन्ही व डव्हा येथे भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष बोरसे व जिल्हा पर्यवेक्षक श्री.मिरगे प्रामुख्याने उपस्थित होते.      
          भेटीदरम्यान जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील डिलिव्हरी रूम, प्रयोगशाळेची व परिसर स्वच्छतेची पाहणी केली.आशा वर्कर यांना कामकाजाविषयी मार्गदर्शन करून संवाद साधला. गरोदर माता तपासणी, अतिजोखमीच्या माता, दर महिन्याच्या 9 तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान तसेच जास्तीत जास्त गरोदर महिलांची स्त्री रोग तज्ञांकडून तपासणी करून घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या तसेच गोल्डन कार्ड,आधारकार्ड व 18 वर्षे पुरुषांच्या आरोग्य तपासणी बाबतचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.
                 तसेच आरोग्य वर्धिनी उपकेंद्र डोंगरकिन्हि येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत भांडेकर, आरोग्य सेवक संदिप नप्ते,आरोग्य सेविका श्रीमती मुक्ता ताले हे चांगले कामकाज करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. 
                  जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस.यांच्या डोंगरकिन्ही येथील भेटीदरम्यान पंचायत समिती सदस्य रविंद्र देशमुख,सरपंच वसंत आडे,सुनिल देशमुख,माजी ऊपसरपंच श्रीमती करुणा गवई,सदस्य अरुण गवई,गोलु गवई,डाटा ऑपरेटर,आशा वर्कर सुनंदा राठोड,भारती जाधव, साधना गवई ऊपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे