उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले माता जगदंबा देवी,संत सेवालाल महाराज व संत रामराव महाराजांच्या समाधीचे दर्शन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले
माता जगदंबा देवी,संत सेवालाल महाराज व संत रामराव महाराजांच्या समाधीचे दर्शन
वाशिम दि.13 (जिमाका) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज 13 ऑक्टोबर रोजी ओबीसी जागर यात्रेनिमित्त मानोरा तालुक्यातील बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे आले असता त्यांनी माता जगदंबा देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी श्री.फडणवीस यांनी संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. बंजारा धर्मगुरु बाबुसिंग महाराज यांची देखील भेट घेतली.यावेळी पालकमंत्री संजय राठोड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, खा.भावना गवळी,आमदार राजेंद्र पाटणी व ऍड.निलय नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी श्री. फडणवीस यांनी संत सेवालाल महाराजांच्या समाधी मंदिराच्या बांधकामाची पाहणी देखील केली.
Comments
Post a Comment