ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू4 ऑक्टोबर रोजी वाशिम शहरात
- Get link
- X
- Other Apps
ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू
4 ऑक्टोबर रोजी वाशिम शहरात
वाशिम, दि. 03 (जिमाका) : दिव्यांग मंत्रालय दिव्यांगाच्या दारी या अभियानाचे अध्यक्ष आमदार (मंत्री दर्जा) ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे 4 ऑक्टोबर रोजी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी 7 वाजता कुरळपूर्ण जि.अमरावती येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने वाशिमकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक. सकाळी 10 वाजता वाशिम शहरातील रिसोड मार्गावरील शासकीय तंत्रनिकेतन समोरील तिरुपती लॉन येथे आयोजित दिव्यांग कल्याण कार्यक्रमाला उपस्थिती. दुपारी 4 वाजता विठ्ठलवाडी मंगल कार्यालय, वाशिम येथे आयोजित ग्रामपंचायत कर्मचारी जिल्हास्तरीय मेळाव्याला उपस्थित राहतील. दुपारी 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह, वाशिम येथे प्रहार कार्यकर्त्यांची बैठक घेतील. सायंकाळी 6 वाजता समाजसेवक माधवराव मारशेट्टीवार गुरुजी यांच्या निवासस्थानी भेट. सायंकाळी 7.30 वाजता सवना, कनेरगाव फाटा जि.हिंगोली येथे शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहतील.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment