खतांचा पुरवठा वेळेत करतांना साठेबाजी होणार नाही याची दक्षता घ्यावी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समिती सभा


खतांचा पुरवठा वेळेत करतांना साठेबाजी होणार नाही याची दक्षता घ्यावी
     जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

 जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समिती सभा

वाशिम दि.28(जिमाका) येत्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा वेळेत करण्यात यावा.पुरवठा वेळेत करतांना खतांची साठेबाजी होणार नाही याची कृषी विभागाने दक्षता घ्यावी.असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी दिले. 
                    27 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीच्या सभेत अध्यक्ष म्हणून श्रीमती बुवनेश्वरी एस. बोलत होत्या.
सभेला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा,प्रभारी कृषी विकास अधिकारी गणेश गिरी,मोहीम अधिकारी भागडे,सर्व पंचायत समितीचे कृषी अधिकारी,सर्व तालुका कृषी अधिकारी,रासायनिक खत कंपनीचे प्रतिनिधी,खते व बियाणे विक्रेते प्रामुख्याने उपस्थित होते.
                  जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या,सर्व खत कंपन्यानी खताचा पुरवठा नियोजनानुसार वेळेत करावा.रब्बी हंगामात किती खत पुरवठा करणार याबाबतचे नियोजन दोन दिवसात सादर करावे.निविष्ठा विक्रेते यांनीसुद्धा मटेरियल कंपनीकडून स्वीकारू नये. रास्त भावात खते-बियाणे शेतकरी बांधवांना उपलब्ध करून द्यावे.कोणी जास्त दराने विक्री केल्यास कृषी विभागाने तात्काळ कारवाई करावी.शेतकऱ्यांना रब्बी हंगामात आवश्यक तेवढे खते व बियाणे कसे उपलब्ध होतील याबाबतचे नियोजन कृषी विभाग,सर्व कंपनी प्रतिनिधी व विक्रेते यांनी करावे असे त्यांनी सांगितले. 
             सभेत जिल्ह्यात सद्यस्थितीत खतांची आणि बियाण्यांच्या उपलब्धते बाबतची माहिती श्री.गिरी यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे