खरीप पिकांची हंगामी पैसेवारी 62 पैसे सरासरी
खरीप पिकांची हंगामी पैसेवारी 62 पैसे सरासरी
वाशिम दि.1( जिमाका) जिल्ह्यात यंदा पिकाखालील क्षेत्र 2 लक्ष 19 हजार 484 हेक्टर आहे. सन 2023 - 24 या वर्षातील खरीप पिकांची हंगामी पैसेवारी सरासरी 62 पैसे इतकी आहे. जिल्ह्यात एकूण 793 गावे आहेत.या सर्व गावांची खरीप हंगामाची पैसेवारी करण्यात आली आहे. यामध्ये वाशिम तालुका - 131, मालेगाव तालुका - 122, रिसोड तालुका - 100, मंगरूळपीर तालुका - 137, कारंजा तालुका - 167 आणि मानोरा तालुका 136 गावांचा समावेश आहे. खरीप हंगामात पैसेवारी काढण्यात आलेल्या महसूल मंडळाची संख्या 46 इतकी असून यामध्ये वाशिम तालुक्यातील 9, मालेगाव रिसोड व कारंजा तालुक्यातील प्रत्येकी 8 मंडळे मंगरूळपीर तालुका 7 मंडळे आणि मानोरा तालुक्यातील 6 मंडळांचा समावेश आहे
Comments
Post a Comment