" स्वच्छ्ता हि सेवा " बस स्टँड परिसर स्वच्छतेत जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग
" स्वच्छ्ता हि सेवा "
बस स्टँड परिसर स्वच्छतेत जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग
वाशिम दि 1(जिमाका) 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून " स्वच्छता ही सेवा 2023 " हा उपक्रम (एक तारीख-एक तास) आज 1 ऑक्टोबर रोजी सकाळी राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शहरी आणि ग्रामीण भागात प्रत्येक वॉर्ड व ग्रामपंचायतीमध्ये 1 तास श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा एक भाग म्हणून तसेच प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणुन हा उपक्रम राबविण्यात आला.
जिल्हाधिकारी बुवनेश्र्वरी एस,यांनी स्वच्छतेच्या कार्यात सहभाग घेतला. जिल्हाधिकारी यांनी बस स्टँड परिसरातील झाडे झुडपे स्वच्छ करीत तेथील कचरा टोपल्यात एकत्र करून उचलून ट्रॉलीमध्ये टाकला या परिसरातून जवळपास पाच ट्रॉली कचरा संकलीत करण्यात आला.जिल्हाधिकारी स्वतः यांनी तासभर काम केले.या वेळी त्यांच्या समवेत सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर,वाशिम नगर पालिकेचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक, विद्यार्थी तसेच समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी व कर्मचारी यांनी देखील वाशिम येथील बस स्टँड परिसर स्वच्छ केला.
Comments
Post a Comment