अधिकाऱ्यांकडून रुग्णालयांची पाहणी व रुग्णसेवेचा आढावा

अधिकाऱ्यांकडून रुग्णालयांची पाहणी
 व रुग्णसेवेचा आढावा 

वाशिम दि.7 (जिमाका) नांदेड व घाटी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी व त्यांच्या अधिनस्त असलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हा रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांना भेटी देण्याचे निर्देश देऊन रुग्णालयांची पाहणी करून रुग्णसेवेचा आढावा घेण्यास सांगितले होते.
            आज जिल्ह्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय,जिल्हा स्त्री रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांना भेटी देऊन रुग्णालयांची पाहणी केली व तेथील वैद्यकीय अधीक्षक यांचेशी चर्चा करून रुग्णसेवेचा आढावा घेतला.
             वाशिम जिल्हा रुग्णालयाला उपजिल्हाधिकारी कैलास देवरे यांनी भेट दिली,जिल्हा स्त्री रुग्णालयाला उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर व प्रभारी तहसीलदार श्री देवळे यांनी भेट देऊन पाहणी केली व रुग्णसेवेचा आढावा घेतला.तसेच मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली व तेथील वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी चर्चा करून रुग्णालयाची पाहणी करून रुग्णसेवेचा आढावा घेतला.मालेगाव ग्रामीण रुग्णालयाला तहसीलदार पुंडे यांनी तर रिसोड ग्रामीण रुग्णालयाला तहसीलदार यांनी भेट दिली. तर मानोरा ग्रामीण रुग्णालयाला प्रभारी तहसीलदार श्री. राठोड यांनी भेट देऊन पाहणी केली.या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णसेवेचा आढावा घेतला. तसेच रुग्णालयात ज्या कमतरता आहे त्याची माहिती घेतली.आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे