अनंत सहकारी शेतकरी सूतगिरणी येथे संशयित क्षयरुग्णांची आरोग्य तपासणी


अनंत सहकारी शेतकरी सूतगिरणी येथे संशयित क्षयरुग्णांची आरोग्य तपासणी 

वाशिम,दि.9 (जिमाका) अनंत सहकारी शेतकरी सूतगिरणी वाशिम येथे आज 9 ऑक्टोबर रोजी ऍड. नकूल देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे,जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अनिल कावरखे , क्षयरोग अधिकारी डॉ.सतिश परभनकर ,‌वैद्यकिय अधिकारी डॉ. रुईकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित क्षयरुग्णांची एक्स रे तपासणी,एड्स,गुप्तरोग,कावीळ व कुष्ठरोगबाबतची आरोग्य तपासणी करण्यात आली.
          सूतगिरणीमध्ये कामगार मोठ्या संख्येने काम करत आहेत. त्यांची आरोग्यविषयक तपासणी केल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी 48 संशयीतांची एक्स रे तपासणी केली.जिल्हा पर्यवेक्षक रवि भिसे,समुपदेशक मिलिंद घुगे, श्रीमती संगीता आगाशे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीमती प्रतिभा अवचार यांनी 41 व्यक्तिंची एड्स, गुप्तरोग, कावीळ बाबत तपासणी केली.यावेळी श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथील प्रशिक्षणार्थी शुभम कड, सुनील वानखडे, कल्पना थरकडे, वैष्णवी कुकडे, वैष्णवी बोरोडे, अश्विनी आसोले, कल्पना जटाले, वैशाली पुंडगे, दिपाली लांडगे, निकिता भगत यांनी सहकार्य केले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुतगिरणीचे मॅनेजर किसनराव देशमुख, जनरल मॅनेजर विशाल मवाळ ,स्पिनिंग मास्टर सुरेश आखरे,प्राचार्य डॉ. किशोर वाहाणे,प्रा. पंडित नरवाडे, गजानन चव्हाण यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. तसेच जिल्हा क्षयरोग केंद्राचे कार्यक्रम व्यवस्थापक समाधान लोनसुने, वरीष्ठ उपचार पर्यवेक्षक रामेश्वर सोनूने,पर्यवेक्षक मंगेश पिंपरकर, वाहनचालक गणेश राऊत यांनी तसेच श्री. सदार (कुष्ठरोग विभाग) यांनी सहकार्य केले. 
         यावेळी उपस्थितांना क्षयरोग, कुष्ठरोग, डेंग्यू बाबत डॉ. सतिष परभनकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी 39 संशयितांची स्पुटम तपासणी करण्यात आली.शिबिराचे नियोजन आरोग्य निरीक्षक रामदास गवई यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे