मतदान ओळखपत्र नसले तरी करता येईल मतदान

·        पर्यायी दस्तऐवजांची यादी जाहीर
वाशिम, दि. १६ :  भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार ११ एप्रिल २०१९ रोजी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. तसेच १८ एप्रिल २०१९ रोजी अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्‍क बजावितांना मतदारांकडे मतदान ओळखपत्र नसल्यास सोबत आणावयाच्या पर्यायी दस्तऐवजांची यादी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.
मतदार ओळखपत्र नसलेल्या मतदारांना मतदान करण्यासाठी पासपोर्ट, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), छायाचित्र असलेले कमर्चारी ओळखपत्र (केंद्र किंवा राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम अथवा सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, पॅन कार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआयद्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्ताऐवज, खासदार अथवा आमदार अथवा विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र व आधारकार्ड यापैकी कोणताही एक दस्ताऐवज सोबत आणावा लागणार आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे