जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
वाशिम, दि. १७ : पिडीत व समस्याग्रस्त महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ
मिळावे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, या दृष्टीने प्रत्येक महिन्याच्या
तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार ऑक्टोंबर
महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, १९ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ११
वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात करण्यात आले आहे. तरी
संबंधितांनी काटा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील कक्ष क्र. २०४ मध्ये महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात संपर्क
साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व
बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
तालुका
स्तरावर चौथ्या सोमवारी आयोजित होणाऱ्या महिला लोकशाही दिनात दाखल तक्रारींबाबत समाधान न
झाल्यास महिलांनी तालुका स्तरावर दाखल केलेल्या तक्रारीच्या टोकन
क्रमांकासाहित विहित नमुन्यात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात अर्ज सादर करावेत. जिल्हाधिकारी
कार्यालयाशी संबंधित तक्रारी सरळ जिल्हास्तरीय महीला लोकशाही दिनात दाखल कराव्यात. जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाच्या अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी काटा रोडवरील
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील कक्ष क्र. २०४ मध्ये महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात संपर्क
साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment