कंत्राटी पद्धतीने लिपीक, शिपाई भरती


·        २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
वाशिम, दि. १७ : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेस मग्रारोहयोच्या कामाकरिता कंत्राटी पद्धतीने एक लिपीक व एक शिपाई या पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी १९ ते २८ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत कार्यालयीन दिवशी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यतच्या कालावधीत कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेत उपस्थित राहून विहित नमुन्यातील अर्जातील माहिती व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती, पासपोर्ट आकराचे फोटो सादर करावेत. २८ नोव्हेंबर नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
लिपीक पदासाठी उमेदवार किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण असावा, मराठी व इंग्रजी टंकलेखन अनुक्रमे ३० व ४० शब्द प्रति मिनिट तसेच एमएस-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच एमआयएसचे ज्ञान असणे सुध्दा आवश्यक आहे. उच्च शैक्षणिक अर्हता व अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. उमेदवार सद्यस्थितीस डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करीत असल्यास किंवा डाटा एन्ट्री ऑपरेटर या कामाचा अनुभव असल्यास त्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. याकरिता उमेदवारांना संबंधित कामाचे तसे अनुभव प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करावे लागेल.
शिपाई पदासाठी उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असावा. शिपाई म्हणून काम केलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. मात्र त्याकरिता त्यास संबंधित कार्यालयाचे अनुभव असल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करावे लागेल, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश