जिल्हाधिकारी कार्यालयात इंदिरा गांधी यांना अभिवादन
वाशिम, दि. १९ : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी
यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी देवराम वानखेडे यांनी इंदिरा गांधी
यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच यावेळी उपस्थित
असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
याप्रसंगी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, नायब
तहसीलदार डॉ. राहुल वानखेडे, घनश्याम डाहोरे, गिरीश जोशी, श्री. नागपूरकर
यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment