राष्ट्रीय लोक अदालतीसाठी पूर्व बैठकांचे आयोजन
वाशिम, दि. १९ :
८ डिसेंबर रोजी वाशिम येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या
अदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी वकिलांसोबत चर्चा करण्यासाठी वेळ मिळावा, याकरिता
पूर्व बैठकांचे आयोजन जिल्हा न्यायालय येथे करण्यात आले आहे.
२३
नोव्हेंबर रोजी मोटार वाहन अपघात प्रकरणे, २४ नोव्हेंबर रोजी भूसंपादन, २७
नोव्हेंबर रोजी धनादेश अनादराची प्रकरणे, २९ नोव्हेंबर रोजी वैवाहिक वादाची
प्रकरणे याबाबत सर्व वकिलांसोबत पूर्व बैठका होणार आहेत. तसेच १ डिसेंबर रोजी सकाळी
१० वाजता विधी सेवा प्राधिकरणाच्या मोबाईल व्हॅनचे देखील उद्घाटन होणार आहे. तरी
न्यायिक अधिकारी, वकील मंडळींनी आणि सर्व बँक इन्सुरन्स कंपन्यांच्या प्रतिनिधींनी
पूर्व बैठका व उद्घाटनाला उपस्थित रहावे, असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा
प्राधिकरण, वाशिम यांनी केले आहे.
Comments
Post a Comment