वाहतूक नियम जागृतीसाठी रविवारी महा वॉकेथॉन
·
नागरिकांनी
जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
वाशिम, दि. १६ : रस्ता सुरक्षा,
नो-हॉर्न व सुरक्षित वाहन चालविणे याबाबत जनजागृती करण्यासाठी वाशिम उप प्रादेशिक
परिवहन कार्यालयाच्यावतीने रविवार, १८ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा
क्रीडा संकुल येथून २ किलोमीटर महा वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
या महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील
सर्व शासकीय कार्यालयीन कर्मचारी, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी,
शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, अध्यापक, विद्यार्थी व नागरिकांनी १८
नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे उपस्थित रहावे, असे
आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment