महारेशीम नोंदणी अभियानाचा १७ डिसेंबरला शुभारंभ
·
१७ ते ३० डिसेंबर दरम्यान होणार रेशीम शेतीविषयी जनजागृती
वाशिम, दि. ११ : जिल्ह्यातील जास्तीत जास्त
शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे, या उद्देशाने १७ ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत
जिल्ह्यात ‘महारेशीम नोंदणी अभियान २०१९’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा
शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालय येथून १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी
लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून केला जाणार
असल्याचे जिल्हा रेशीम विकास अधिकारी अरविंद मोरे यांनी कळविले आहे. जिल्ह्यातील
विविध गावांमध्ये जावून हा चित्ररथ रेशीम शेतीविषयी जनजागृती करणार आहे.
अभियान
कालावधीत चित्ररथासोबत जिल्हा रेशीम कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी राहणार असून
गावोगावी जावून शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना रेशीम शेती करण्याबाबत
प्रोत्साहित करण्यात येणार आहे. तसेच त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणार आहेत. भविष्यात
जिल्ह्याचा नावलौकिक रेशीम उत्पादक जिल्हा म्हणून करण्यासाठी जिल्हा रेशीम
कार्यालय प्रयत्न करीत आहे. ज्या शेतकऱ्यांना रेशीम शेती करण्याची इच्छा आहे,
त्यांनी अभियान कालावधीत नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी पुसद नाक्याजवळील
उलेमाले यांच्या बंगल्यातील जिल्हा रेशीम कार्यालयाला प्रत्यक्ष भेट द्यावी अथवा ०७२५२-२३२५५२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क
साधावा, असे आवाहन श्री. मोरे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment