नागपूर येथे २७ डिसेंबरपासून सैन्य भरती


वाशिम, दि. १४ : २७ डिसेंबर २०१८ ते २ जानेवारी २०१९ या कालावधीत नागपूर सीताबर्डी येथील ११८ इन्फंट्री बटालियन (टी ए) ग्रेनेडीयर्स येथे सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सोल्जर जी डी, सोल्जर छेफ व सोल्जर हेअर ड्रेसर या पदांची भरती होणार असून इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह २७ डिसेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता हजर रहावे.
सोजर जी डी पदासाठी उमेदवार किमान ४५ टक्के गुणांसह इयत्ता १० वी पास असावा. इयत्ता १२ वी आणि त्यापेक्षा जास्त शिक्षित उमेदवारांना ४५ टक्के गुणांसह १० वी पास असणे आवश्यक नाही. सोल्जर ट्रेडस्मन (छेफ) व सोल्जर हेअर ड्रेसर पदासाठी उमेदवारी किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दोन्ही पदांसाठी उमेदवारांची किमान उंची १०६ से.मी., वजन ५० किलोग्रॅम व ७७ सेमी (५ सेमी फुगवणे) असावी. १८ ते ४२ वयोगटातील उमेदवारच या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील, असे वाशिम जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश