प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जटाळे यांच्या हस्ते ‘लोकराज्य’च्या विशेषांकाचे विमोचन
वाशिम, दि. ११ : महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य
शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने
प्रकाशित करण्यात आलेल्या लोकराज्य मासिकाच्या ‘क्रांतिसुर्याला विनम्र अभिवादन !’
विशेषांकाचे विमोचन आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जटाळे यांच्या
हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा
विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,
माहिती सहाय्यक तानाजी घोलप उपस्थित होते.
लोकराज्यच्या
‘क्रांतिसुर्याला विनम्र अभिवादन !’ विशेषांकामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वावर आधारित विविध मान्यवरांच्या लेखांचा
समावेश आहे. भारतीय लोकशाही मजबूत करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांनी केलेले प्रयत्न, भारतीय राज्यघटना आदी बाबींवर या लेखांमध्ये प्रकाश
टाकण्यात आला आहे. तसेच शासनाच्या विविध योजनासंबंधी यशोगाथांचा समावेशही या
विशेषांकात आहे.
Comments
Post a Comment