ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत जिल्ह्यात राबविणार जनजागृती मोहीम
वाशिम, दि. २१ : लोकशाही व्यवस्थेत मतदान
प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएम मतदान यंत्रासोबतच
वापरण्यात येणाऱ्या व्हीव्हीपॅट या नवीन यंत्राच्या वापराबाबतची माहिती देण्यासाठी
जिल्ह्यात २६ डिसेंबरपासून जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याबाबतची माहिती प्रत्येक मतदाराला व्हावी, यासाठी
हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाच्यावतीने
जिल्ह्यातील गावोगावी जावून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या मतदान यंत्राची प्रात्यक्षिके
मतदारांपुढे करून ही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील रिसोड, वाशिम आणि कारंजा या तीन विधानसभा मतदारसंघात १०४३ मतदान
केद्रे आहेत. रिसोड विधानसभा मतदारसंघात ३२६, वाशिम मतदारसंघात ३६५ आणि कारंजा
मतदारसंघात ३५२ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन पथक स्थापन
करण्यात आले असून प्रत्येक पथकात पाच सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रमाणे
जिल्ह्यात सात पथके याबाबत जनजागृती मोहीम राबविणार आहेत.
तीनही मतदारसंघात गावोगावी जावून सर्व संबंधित मतदानकेंद्रांच्यास्थळी ईव्हीएम
आणि व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिके दाखवून जनजागृती करण्यात येणार आहे. तालुक्यातील
जनजागृती मोहीम संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली
राबविली जाणार आहे. तरी सर्व मतदारांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत येणाऱ्या
राबविण्यात येणाऱ्या जनजागृती मोहिमेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी
तथा जिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.
Comments
Post a Comment