अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील युवक-युवतींना मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण


·        २० डिसेंबर रोजी शारीरिक चाचणीद्वारे होणार निवड
वाशिम, दि. ११ : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक, युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजनेंतर्गत शारीरिक चाचणी २० डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता वाशिम येथील शासकीय वसाहतीजवळील पोलीस परेड मैदानावर होणार आहे. तरी इच्छुक युवक-युवतींनी आवश्यक कागदपात्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे. 
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील १८ ते २५ वयोगटातील किमान १२ वी उत्तीर्ण युवक-युवतींना या प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल. किमान १५५ सें.मी उंची असलेल्या महिला उमेदवार आणि ७८ सें.मी. ते ८३ सें.मी छाती व किमान १६५ सें.मी. उंची असलेल्या पुरुष उमेदवारांनी १२ वी पास गुणपत्रिका, रहिवाशी दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला, सेवायोजन नोंदणी प्रमाणपत्र, २ पासपोर्ट फोटो इत्यादी कागदपत्रांसह शारीरिक चाचणीसाठी उपस्थित रहावे. हे प्रशिक्षण अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे तीन महिन्याच्या कालावधीत पूर्ण करावे लागणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणाबाबतच्या सोयी सुविधा शासनातर्फे मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश