26 जून रोजी मंगरूळपीर येथील मुलींच्या वसतीगृहाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थिती दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन
26 जून रोजी मंगरूळपीर येथील मुलींच्या वसतीगृहाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थिती दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन
वाशिम दि.25 (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मंगरूळपीर येथील मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 26 जून रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.यावेळी विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री संजय राठोड,
जि. प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार भावना गवळी,खासदार संजय धोत्रे, विधान परिषद सदस्य आमदार सर्वश्री ऍड.किरणराव सरनाईक,वसंत खंडेलवाल,धीरज लिंगाडे,विधानसभा सदस्य आमदार सर्वश्री लखन मलिक,राजेंद्र पाटणी व अमित झनक यांची तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक न्याय विशेष व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे,समाज कल्याणचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे,जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी दिली.
Comments
Post a Comment