दोनदच्या शेतकरी गटाला श्री.मुळे यांची भेट व संवाद


दोनदच्या शेतकरी गटाला श्री.मुळे यांची भेट व संवाद

वाशिम दि.29 (जिमाका) अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी आज कारंजा तालुक्यातील दोनद येथे कृषी संजीवनी सप्ताह निमित्त शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन बाळाराम शेतकरी बचत गटातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अमरावतीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ राहुल सातपुते, अमरावतीचे उपविभागीय कृषी अधिकारी डॉ.चेडे,वाशिमचे कृषी उपसंचालक शांताराम धनुडे,वाशिमचे तंत्र अधिकारी दिलीप कंकाळ व कारंजा तालुका कृषी अधिकारी संतोष चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
         यावेळी दोनद येथील शेतकरी तसेच कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.फार्मर कप स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या गटाने विविध उपक्रम राबविले.त्याची पाहणी यावेळी श्री.मुळे व अन्य कृषी अधिकाऱ्यांनी केली.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर